खुलेआम ‘अर्धनग्न’ फोटोशुट करणारे ‘ते’ तरुण-तरुणी ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॉडेलिंगसाठी अर्धनग्न होऊन फोटोशुट करणाऱ्या तरुणीला आणि फोटो क्लीक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुल्दाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खुसरोबागमध्ये हा फोटोशुट करण्याचा प्रकार सुरु होता. ताब्यात घेतलेल्या दोघांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. युवकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता युवकाने यावर आपली बाजू मांडली आहे. युवकाने सांगितले आहे की, तो एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे जो दिल्लीतील एका मॅगेझिनसाठी हे फोटोशुट करत होता.

अशेर असं या फोटो काढणाऱ्या युवकाचं नाव असून तो कर्नलगंजमधील युवतीचे अर्धनग्न फोटोशुट करत होता. अशेर हा खुसरोबागमधील बेली हॉस्पिटल परिसरातील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री घडलेला हा प्रकार आहे. अशेर युवतीचे फोटोशुट करत होता त्यावेळी खुसरोबागमध्ये फिरत असलेल्या काही वृद्धांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अशेर आणि त्या युवतीला ताब्यात घेतले. यानंतर सार्वजनिक ठिकाणी आपत्तीजनक फोटोशुट करण्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला.

परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी असे अर्धनग्न फोटोशुट करण्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही लोकांनी म्हटले आहे की, त्यांनी असे काही करण्याची हिंमत केलीच अशी. अशा प्रकारे नागरिकांमधूनही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –