सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरमधील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शुक्रवारी रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली आहे.

मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणे असल्याने त्यांना खबरदारी म्हणून किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रात्री उशिरा ट्विट करीत डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली असल्याचे व त्यांना लवकर बरं वाटावं, म्हणून देवाकडे प्रार्थना करतो, असे गडकरी यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.