चांदी प्रतिकिलो 50000, तब्बल 7 वर्षानंतर ‘चकाकी’ ! सोनं एका दिवसात 1 हजारांनी ‘महाग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याचांदीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मंगळवारी चांदीचा दर प्रतिकिलो 50 हजार रुपयांपेक्षा जास्त झाला. 40,600 रुपयांच्या दहा ग्रॅमच्या किंमतीवर एक हजारांच्या वाढीसह सोन्याचा भावही वाढला. बुलियन तज्ज्ञ राहुल गुप्ता म्हणाले की, मंदीच्या काळात या दोन धातूंकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिल्याने सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
मंगळवारी एक किलो चांदीची किंमत 50, 500 रुपयांवर पोहोचली. चौक सराफा व्यावसायिका विशाल गुप्ता म्हणाले की, एप्रिल 2013 मध्ये एक किलो चांदीची किंमत 50 हजार रुपये होती. यानंतर चांदीच्या भावात स्थिर घसरण दिसून येत आहे. ते म्हणाले की चांदीची किंमत प्रति किलो 38 हजार रुपयांवर आली होती. परंतु या अर्थसंकल्पात अडीच टक्क्यांची आयात शुल्काची वाढ सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येते. त्यांनी सांगितले की, 17 जुलै 2019 रोजी चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठला आणि 41 हजार रुपये प्रति किलोचा आकडा पार केला. यानंतर चांदीचे दर सतत वाढत राहिले.
एका दिवशी एक हजार इतका सोन्याचा दर वाढला –
सोमवार ते मंगळवार दरम्यान सोन्याच्या किंमतीत सुमारे एक हजार रुपयांची प्रति दहा ग्रॅम वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दहा ग्रॅम सोन्याची किंमत 40 हजार 600 रुपयांवर पोचली. आठवड्याभरापूर्वीही सोन्याने 40 हजारांची किंमत ओलांडली आहे. पण त्यानंतर त्यात सुमारे एक हजार रुपयांची घसरण नोंदली गेली.
- शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे