‘लॉकडाऊन’मध्ये गोव्यात अडकली होती ‘उतरन’ फेम टीना दत्ता, 100 दिवसांनी मुंबईत परतली ! शेअर केला अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीन्ही मालिका उतरन फेम अभिनेत्री टीना दत्ता लॉकडाऊनच्या आधी गोवाला व्हॅकेशनसाठी गेली होती. यानंतर लॉकडाऊनमुळं ती तिथेच अडकली होती. अशी माहिती आहे की, आता 100 दिवसांनी टीना दत्ता मुंबईत परतली आहे.

एका मुलाखतीत आपला अनुभव सांगताना टीना म्हणली, “मी गोव्यात होते म्हणून सरवाईव करू शकले. जर मुंबईत असले असते तर मला क्वारंटाईनमध्ये रहावं लागलं असतं. मला तर वेडच लागलं असतं. कारण मुंबईत मी एकटीच रहात होते. एकाच रूममध्ये कैद राहणं माझ्यासाठी अवघड झालं असतं. गोव्यात माझ्यासोबत आशका (अॅक्ट्रेस आशका गोराडिया) आणि तिचा पती होता. ज्यांच्याकडून मी योग शिकले.”

टीनानं लॉकडाऊनच्या काळात तिचे योगा करतानाचे अनेक फोटो सोशलवर शेअर केले होते. हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसले होते. लॉकडाऊनमध्ये फिट राहण्यासाठी योगाची तिला खूप मदत झाली असं ती सांगते.

टीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं 5 वर्षांची असतानाच करिअरला सुरुवात केली होती. सिस्टर निवेदिता या मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनसोबत चोखेर बाली या सिनेमात ती झळकली आहे. याशिवाय तिने अनेक मालिकेत काम केलं आहे. उतरन ही तिची मालिका प्रचंड गाजली.