‘या’ कारणामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ, केंद्रीय महसूल सचिवांनी सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सध्या सोन्याच्या किंमती वाढत आहेत. याचे विविध स्तरावर विविध कारणे सांगण्यात येत आहेत. सोन्याची किंमती का वाढत आहे याचे कारण आता केंद्रीय महसूल सचिव अजय पांडे यांनी सांगितले आहे. सोन्याच्या किंमतीच्या मानकीकरणावर आवश्यकतेवर त्यांनी लक्ष केले. ते म्हणले की, लोकांनी सोन्यासह इतर संपत्तीमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत, ज्यामुळे या धातूच्या किंमती वाढत आहे.

पांडे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका असेल किंवा जपान किंवा शंघाय, शेअर बाजारात घसरण होत आहे. सचिवांनी यावेळी सोन्याच्या वाढत्या किंमतींवर प्रश्नांची उत्तरे दिली.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती देखील वाढल्या आहेत. सरकारच्या सोन्या संबंधित योजनेवर बोलताना ते म्हणाले की, सोन्याचे मूल्य आपण नक्की कसे ठरवणार ही समस्या आहे. लोकांकडे सोने आहे परंतू त्याचे मानकीकरण अजूनही करण्यात आलेले नाही. मौद्रिकरणासाठी सोन्याचे मानकीकरण करणे आवश्यक आहे.

सध्या सोन्याच्या किंमती वाढत आहेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली मंदी आहे, तसेच अमेरिका चीनमधील व्यापार युद्धाचा सोन्याच्या दरावर परिमाण होतं असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –