ऑर्डर कॅन्सल केल्यानं भडकला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, मुलीच्या तोंडावर दिला ‘मुक्का’ !

पोलीसनामा ऑनलाईन : आजकाल वेळ वाचविण्यासाठी ऑनलाइन फूड डिलीव्हरीचा ट्रेंड बर्‍याच प्रमाणात वाढला आहे. लोक काही मिनिटांतच घरात त्यांचे आवडते पदार्थ खातात, पण अशी अनेक प्रकरणे समोर येतात, जी हैराण करणारी आहेत. बंगळूरमध्ये एका युवतीने असा आरोप केला की, ऑर्डर कॅन्सल केल्याने झोमॅटो बॉय भडकला आणि तिच्या तोंडावर बुक्का मारला. हितेश चंद्रानी नावाच्या महिलेने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, तिच्या नाकातून रक्त येताना दिसत आहे. त्याच वेळी झोमॅटो नेही दिलगिरी व्यक्त करत आणि पोलिसांच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

https://www.instagram.com/tv/CMOJo0XnfET/?utm_source=ig_web_copy_link

ब्यूटी इंफ्लून्सर हितेशा चंद्रानी यांनी सांगितले की, तिने झोमॅटो वरून ऑर्डर प्लेस केली होती, परंतु ऑर्डर वेळेनंतर देण्यात आली, ज्यामुळे तिने कस्टमर केयरशी बोलून ऑर्डर कॅन्सल केली. व्हिडिओमध्ये हितेशा म्हणाली, “डिलिव्हरी बॉय दारात आल्यानंतर मी त्याला सांगितले की मला ऑर्डर नको आहे, तूम्ही परत घेऊन जा” परंतु त्याने असे करण्यास नकार दिला आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मी लगेच दार बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याने ताबडतोब दरवाजा उघडला आणि ऑर्डर हातात घेतली आणि मला तोंडावर मारले.”

हितेशा पुढे म्हणाली की, इमारतीतील इतर कोणीही घटनेबद्दल ऐकले नाही. या घटनेमुळे तिच्या नाकाचे हाड तुटले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे या महिलेचा दावा आहे. हितेशाला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला बरीच औषधेही दिली. या घटनेनंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन डिलीव्हरी बॉयविरूद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. हितेशा म्हणाली की लोकांनी हा व्हिडिओ शक्य तितका शेयर करावा की, ही घटना इतर कोणासही होऊ नये म्हणून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर झोमॅटोनेही प्रतिक्रिया दिली आहे.

झोमॅटो म्हणाले की, आमचे स्थानिक प्रतिनिधी आपल्याला आवश्यक वैद्यकीय सेवेसाठी मदत करण्यासाठी तसेच पोलिस तपासात मदत करण्यासाठी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आम्ही आवश्यक कारवाई करू.