YES Bank Case : CBI नं राणा कपूर, त्यांची मुलगी आणि DHFL च्या प्रमोटर्सविरुद्ध दाखल केलं आरोपपत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सीबीआयने गुरुवारी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची मुलगी आणि डीएचएफएलचे प्रमोटर आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल आणि धीरज वधावन यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १०० पानांच्या या आरोपपत्रात DOiT अर्बन व्हेंचर्स लिमिटेडचे नाव असून डीएचएफएलला आरोपी म्हटले गेले आहे.

येस बँकेने संशयास्पद कर्ज जारी केल्यानंतर सीबीआयच्या वतीने ७ मार्च रोजी हे प्रकरण दाखल केले होते. याचबरोबर बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल आणि धीरज वधावन यांनी एकमेकांना फायदा पोहोचवल्याचा आरोप आहे. येस बँकेने डीएचएफएलच्या अल्प मुदतीच्या कर्जात सुमारे ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि डीओआयटी अर्बन व्हेंचर्स लिमिटेडला डीएचएफएलने दिलेल्या सहाशे कोटींच्या कर्जाबद्दल तपास सुरू होता. डीओआयटी अर्बन व्हेंचर्स लिमिटेड ही वास्तविक राणा कपूर यांच्या मुलींची कंपनी आहे.

असे मानले जाते की, डीएफएफएलकडून कंपनीला दिले गेलेले ६०० कोटी रुपयांचे कर्ज राणा कपूर यांच्या डीएचएफएलच्या डिबेंचरमध्ये पैसे लावण्याच्या बदल्यात दिली गेलेली लाच होती. ईडीने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ४,३०० कोटी रुपये गुन्हात्मक कमाईचे पैसे असल्याचा आरोप केला होता. ही रक्कम त्यांना या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यासाठी लाच म्हणून बँकेमार्फत दिली गेली. दिले गेलेले कर्ज नंतर नॉन-परफॉर्मिंग ऍसेट (एनपीए) झाले. ज्यामुळे येस बँक अडचणीत सापडली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like