Strengthen teeth Home Remedies : सैल दातांच्या समस्येने असाल त्रस्त, तर अवलंबा ‘हे’ 3 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : काही चुकांमुळे आणि वय वाढल्यानंतर काही लोकांच्या दातात सैलपणा येतो. या समस्येला तोंड देणे खुप त्रासदायक असते. यामुळे तुम्ही सतत त्रस्त राहात असाल तर आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जाणून घेवूयात हे उपाय…

1 आवळा पावडर –
एक वाटीत एक चमचा आवळा पावडर आणि 2 चमचे पाणी मिसळा. यानंतर हे मिश्रण बोटावर घ्या आणि आपले दात आणि हिरड्यांवर मसाज करा.

2 कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लीमेंट घ्या –
दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त फुड खा. सप्लीमेंट सुद्धा घेऊ शकता.

3 लसून –
लसूणाची एक पाकळी घेऊन ती सोलून घ्या आणि दोन तुकडे करा. एक तुकडा प्रभावित ठिकाणाच्या जवळ आपल्या हिरड्यांमध्ये ठेवा. रस दातांवर पसरला पाहिजे.