विद्यार्थी जेव्हा महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता, तेव्हा गपचूप काढला महिलेचा अश्लील व्हिडीओ; WhatsApp वर ‘असा’ झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युनायटेड किंगडमच्या लिवरपूलमधून हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यानं महिलेसोबत विचित्र अवस्थेत असताना गुपचूप महिलेचा अश्लील व्हिडीओ काढला. यानंतर त्यानं हा व्हिडीओ रग्बी टीमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केल. महिलेला कल्पना देखील नव्हती की, तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

अश्लील व्हिडीओ बनवणारा विद्यार्थी हा 21 वर्षांचा आहे. सॅम्युअल हॅरन असं त्याचं नाव आहे. सॅम्युअलनं 16 सेकंदाचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला होता. जेव्हा महिलेनं हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ती म्हणाली, ज्याच्यावर विश्वास आहे तोच असं करेल असं वाटलं नव्हतं. यानंतर महिलेनं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आरोपी तरुण
तपासात समोर आलं की, महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणारा सॅम्युअल द लिवरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. जेव्हा तो महिलेसोबत विचित्र अवस्थेत होता, तेव्हा त्यानं परवानगी न घेता तिचा व्हिडीओ बनवला होता. नंतर त्यानं तो व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला.

असा झाला खुलासा
लिवरपूल मॅजिस्ट्रेक कोर्टानं या प्रकरणी सांगितलं की, आरोपी सॅम्युअल हॅरन यानं महिलेचा 16 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. त्यावेळी महिलेला माहित नव्हतं की व्हिडीओ शुट होत आहे. नंतर एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिला या व्हिडीओ बद्दल समजलं. कोर्टान असंही सांगितलं की, सॅम्युअलला 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तानं याबाबत माहित दिली आहे.