अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हि परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सध्या बंद असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फक्त विशेष लोकल धावत आहेत. तसेच आता विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवून लोकलने प्रवास करू शकतात.

ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.विद्यार्थ्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु करण्यात येणार आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन असे आवाहन केले आहे तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.