शिक्षक दारू पितात …!  विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा

अमळनेर :पोलीसनामा ऑनलाईन 
आळमनेर तालुक्यातील  पिंपळे येथील सु. आ. पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या मागण्यांकरिता मोर्चा काढला. या शाळेतील शिक्षक रात्री दारू पितात अशी या विदयार्थ्यांची तक्रार आहे. एवढेच नाही तर हे शिक्षक विद्यार्थ्याना मारहाण देखील करतात. आता शिक्षकांच्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी पायी मोर्चा काढला. पिंपळे (ता. अमळनेर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 150 ते 200 विध्यार्थ्यांनी आज सकाळी 7 च्या सुमारास मोर्चाला सुरूवात केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b26f239d-d071-11e8-86f5-39820beff228′]
शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुष पणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, जेवणात आळ्या, किडे निघत असतात अशा अनेक तक्रारी करत थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठले. या मोर्चात शिक्षकाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W,B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be2a1198-d071-11e8-abf5-15ec77597ee6′]
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मागण्या मान्य होतील असे आश्वासन देत मोर्चा थांबविण्याचा प्रयत्न केला.  परंतु, संतप्त झालेले विद्यार्थ्यां कोणाच्याही आश्वासनांना भूलले नाहीत आणि कोणाचेही काहीही ऐकून न घेता आपला मोर्चा चालूच ठेवला. आता जर भविष्य घडवणारे शिक्षकच असे वागत असतील तर आम्ही पाहायचे कुणाकडे असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला.