सावधान ! मेकअपसाठी ‘स्पंज’ आणि ‘मस्कारा’चा वापर करतांय ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या काळात महिला या स्वत:चे लुक्स आणि मेकअपच्या बाबतीत खूप जागरुक दिसून येतात. कारण प्रत्येकालाच स्पेशल दिसायचं असतं. त्यासाठी महिला सतत सौंदर्य वाढवणाऱ्या मेकअप प्रॉडक्ट्सचा शोध घेताना दिसतात. मात्र, आम्ही तुम्हाला मेकअप प्रॉडक्टबद्दल एक महत्वाची माहिती सांगणार आहोत. एका अहवालानुसार, ब्युटी ब्लेंडर म्हणजेच मेकअप स्पंज आणि इतरही काही प्रॉडक्ट्स मध्ये बॅक्टेरिया वाढत असतात.

मेकअप प्रॉडक्ट्समध्ये जीवघेणे बॅक्टेरिया
अमेरिकेमधील एस्टन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, मेकअप प्रॉडक्टमध्ये जीवघेणे बॅक्टेरिया असल्याचं समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या अहवालात अभ्यासकांनी सांगितलं की, ब्युटी ब्लेंडर, मेकअप स्पंज, मस्कारा आणि लिप ग्लॉस सारख्या अनेक मेकअप प्रॉडक्टमध्ये जीवघेणे बॅक्टेरिया असतात.

गंभीर आजारांचा धोका
या अहवालाचे मुख्य लेखक अमरीन बशीर यांनी म्हटलं की, युकेमध्ये लाखो लोक दररोज ज्या मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करतात. त्यामध्ये संभावित जीवघेणे सूपबग्स जसे की, ई-कोलाय आणि स्टॅफिलोकोकी सारखे बॅक्टेरिया आढळून येतात. त्याचं कारण, हे प्रॉडक्ट्स बरेच दिवस साफ केले जात नाही आणि अनेकजण तर त्याची मुदत संपल्यावर सुद्धा वापर करतात. त्यातील ई-कोलाई बॅक्टेरिया जास्त नुकसानदायक नसतात. मात्र, काही इतके घातक असतात की, ज्यामुळे डायरिया, किडनी फेलिअर आणि मृत्यू ओढवू शकतो.

९३ टक्के बॅक्टेरिया स्पंजमध्ये
जर्नल ऑफ अल्पाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, मेकअप प्रॉडक्ट्समध्ये आढळून येणाऱ्या बॅक्टेरियामुळे केवळ स्किन इन्फेक्शन नाही तर ब्लड पॉयजनिंग देखील होऊन शकते. तसेच याचा वापर डोळे, तोंडाच्या जवळपास केला तर याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अहवालात सांगितल्यानुसार, फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेकअप स्पंज अथवा ब्युटी ब्लेंडरमध्ये जास्तीत जास्त ९३ टक्के नुकसानदायक बॅक्टेरिया आढळून येतात.