Success Square Kothrud | सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या स्वप्नपूर्ती कोनशिलेचे अनावरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्व सभासदांच्या एकजुटीमुळेच सक्सेस स्क्वेअर सोसायटीचा (Success Square Kothrud ) दिमाखदार प्रकल्प उभा राहू शकला आहे. या प्रकल्पातील नियोजित विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही प्रकल्प विकसक व सारथी समुहाचे संचालक विजय मुंडे (Vijay Munde) यांनी शुक्रवारी दिली. (Success Square Kothrud)

 

 

कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या (Success Square Kothrud) ‘स्वप्नपूर्ती’ या कोनशीलेचे अनावरण आणि सक्सेस सभागृह, अत्याधुनिक जिम आणि बाल क्रीडांगणाचे उद्धघाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव (Shantaram Jadhav), नगरसेवक पृथ्वीराज सुतार (Corporator Prithviraj Sutar), शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Corporator Manjushree Khardekar), नगरसेवक जयंत भावे (Corporator Jayant Bhave) आणि विकसक विजय मुंडे यांच्या उपस्तिथीत शुक्रवारी झाले. त्यावेळी सभासदांशी संवाद साधताना मुंडे यांनी हे आश्वासन दिले.

 

विविध कायदेशीर अडथळे आणि करोनाचे संकट यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. परंतु, दोन्ही सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केल्यानेच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, असेही ते म्हणाले.

 

 

 

कर्वे रस्त्यावरील मधुवंती आणि लक्ष्मीनारायण पार्क सोसायट्यांच्या पुनर्वसन योजनेतून सक्सेस स्क्वेअर (Success Square Kothrud) हा गृहप्रकल्प उभा राहिला आहे.
त्याच्या स्वप्नपूर्ती समारंभास आठवणीने बोलाविल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोसायटीच्या अध्यक्षांचे आभार मानले.
सुतार, खर्डेकर व भावे यांनी यावेळी बोलताना सोसायटीचे प्रश्न व नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आपण सर्व ते सहकार्य देऊ असे आश्वासन दिले.
वाढत्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम (Exercise) अत्यंत महत्वाचा आहे.
सोसायटीतील जिम (Jim) त्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरणार असून रहिवाशांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या सुविधेचा चांगला उपयोग करून घ्यावा,
अशी अपेक्षा अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

 

सोसायटीचे सचिव प्रदीप काजळे (Secretary Pradip Kajale) यांनी प्रास्ताविक केले.
अध्यक्ष नागेश नलावडे (President Nagesh Nalawade) यांनी सोसायटी पुनर्वसन प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेताना
त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल ऋण व्यक्त केले. विठ्ठल रायरीकर (Vitthal Rayarikar) यांनी आभार मानले.

 

Web Title :- Success Square Kothrud | Unveiling the cornerstone of the Success Square Society’s dream

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा