Sudhir Mungantiwar | शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत येणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात आज (दि. 10) शिवप्रताप दिन साजरा होत आहे. आजच्या दिवशी 1659 साली मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीतील सरदार अफझल खान याचा प्रतापगडावर वध केला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या हालाचाली सुरु करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले आहेत.

 

त्यांच्या या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 2024 पर्यंत जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणली जाईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की, ऋषी सुनक (Rushi Sunak) हे ब्रिटनेचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) जगदंबा तलवार होती, ती आम्हाला परत मिळावी. इंग्रजांनी ही तलवार नेली होती. त्या तलवारीला शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेला होता. त्यामुळे ती तलवार आमच्यासाठी जगातील सर्व संपत्तीपेक्षा अमूल्य आहे. त्यामुळे ती परत आणण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करीत आहोत. 2024 च्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे त्यावेळी ती तलवार ब्रिटनेने आम्हाला दिली, तर आमचा आनंद द्वीगुणीत होणार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

कोल्हापूरच्या छत्रपतींकडे शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार होती. ही तलवार 1875 साली इंग्रजांनी बळजबरीने घेतली होती.
ही तलवार शिवाजी महाराजांचीच असल्याचे ब्रिटीश दस्ताऐवजात आढळले आहे.
त्यामुळे ही तलवार परत आणण्यासाठी 1900 दशकात अनेक प्रयत्न करण्यात आले होते.
तसेच ही तलवार परत आणण्यासाठी भारत आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असेल, तक इतिहास प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे,
असे लेखक आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांनी म्हंटले आहे.

 

Web Title :- Sudhir Mungantiwar | chhatrapati shivaji maharaj jagdamba sword to be brought to maharashtra announcement of govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Atul Bhatkhalkar | संजय राऊतांच्या कटुता संपवण्याच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांचा टोला म्हणाले -‘फक्त याची सुरुवात त्यांनी…’

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”