ताज्या बातम्यापुणे

Sudhirkumar Bukke | सुधीर कुमार बुक्के यांची न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sudhirkumar Bukke | पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के (Sudhirkumar Bukke) यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायाधीश संघटनेच्या (Maharashtra State District Judges Association) उपाध्यक्षपदी (Vice President) बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे पुणे जिल्हा बार असोसिएशन, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि धर्मादाय ट्रस्टच्या वतीने बुक्के यांचे स्वागत करत सत्कार करण्यात आला आहे. (Pune News)

 

पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे (Pandurang Thorve) यांनी सुधीरकुमार बुक्के यांचा सत्कार केला आहे. त्याचबरोबर आळंदी देवस्थान, जेजुरी देवस्थान, दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट यांच्यासह वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला गेला आहे. तसेच पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

 

दरम्यान, सुधीरकुमार बुक्के यांनी कोरोना कालावधीत प्रशंसनीय कार्य केले आहे. झिरो पेंडेन्सीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले, तसेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे धर्मादाय विभाग (Pune Charity Department) महाराष्ट्रात अव्वलस्थानी आला आहे. त्याचबरोबर धर्मादाय विभागात कार्यरत असताना राज्यस्तरीय पदावर निवड होणारे बुक्के हे प्रथमच न्यायिक अधिकारी आहेत. यामुळे त्याचंं अभिनंदन करण्यात आलं आहे. यावेळी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागीरदार (Add. Shivraj Kadam Jahagirdar), सचिव ॲड. सुनील मोरे (Add. Sunil More), ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप हांडे (Add. Dilip Hande) आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Sudhirkumar Bukke | pune sudhir kumar bukke unopposed as vice president of maharashtra state district judges association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

Back to top button