PHOTOS : ‘किंग’ खानची लाडकी सुहाना करते डोळ्यांनी ‘खोड्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसत आहे. अद्याप तिनं कोणताही सिनेमा साईन केलेला नाही. परंतु आपल्या फोटोंमुळं ती नेहमीच अटेंशन घेत असते. अलीकडेच आपल्या काही लेटेस्ट फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे. सुहानानं क्युट आणि ग्लॅमरस फोटोंनी पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B9t63Iinvzo/

सुहानानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. सुहानाचे हे फोटो सेल्फी आहेत ज्यात ती वेगवेगळ्या पोज आणि वेगवेगळे एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. सुहाना या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. तिचे डोळेही कमालीचे सुंदर दिसत आहेत. सुहाना एखादा फोटो समोर आला आणि तो व्हायरल झाला नाही, असं कधी होतच नाही. यावेळीही सुहानाचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनाही सुहानाचा हा क्युट आणि ग्लॅमरस अंदाज खूपच आवडला आहे.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो (Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/Bk2vP_enY0x/

https://www.instagram.com/p/BdU849xgeLn/

https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/

https://www.instagram.com/p/B9nrTZoIkLN/

https://www.instagram.com/p/B8-eXkwBPIQ/