खळबळजनक ! पोलिसाचा प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

वाई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेयसीबरोबर झालेल्या वादानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसीच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या या पोलीस कर्मचाऱ्यावर वाईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पाचगणी पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी वाईमध्ये वास्तव्यास आहे. दुपारी तो आपल्या प्रेयसीच्या घरी भेटायला गेला होता. त्यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने प्रसंगावधान दाखवून गळफास घेतलेला कपडा चाकूने कापून टाकला. त्यामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. त्यानंर तिनेच शेजाऱ्यांना बोलावून त्याला वाईमधील एका खसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या पोलिसाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. वाई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात जाऊन यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like