विवाहित प्रेयसीकडून ‘लव्ह’, ‘सेक्स’ अन् नंतर लग्नास नकार, लिव इनमध्ये राहणार्‍या युवकाची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विवाहित प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने पानीपतमध्ये राहणा-या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरूण विवाहित प्रेयसीसोबत गेल्या काही दिवसांपासून लिव इनमध्ये राहत होता. याप्रकरणी तरूणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणाची 5 महिन्यापूर्वी सदर महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर ते गेल्या काही दिवसांपासून लिव इनमध्येही राहत होते. सदर महिला तरुणाला लग्नाचे अमिष दाखवून नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणाच्या तपास करणा-या पोलीस अधिका-याने सांगितले की, इंडियन बॅंक बर्स्ट रोड समोरील एका घरात भाडेकरूने गळफास घेतली घेतल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार आम्ही घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तरूणाचा मृतदेह खाली काढला. तरूणाचा मोबाईल चेक केले असता त्यात त्याने एका महिलेसोबत चॅटींग करत असल्याचे आढळले. प्राथमिक चौकशीतून समोर आले की, दोघे घरातून 5 लाख रूपये घेऊन पळाले होते. तसेच मृत तरूणाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, महिला आधीच विवाहित असून ती 3 लेकराची आई आहे. या प्रकरणी तिला शिक्षा व्हावी. कारण तिच्यामुळे आमच्या मुलाचा जीव गेला आहे.