धक्कादायक ! 12 दिवसांच्या चिमुकलीच्या आईची आत्महत्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका बाळंतिणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शीतल साळवे असे या महिलेचे नाव असून मागील दोन दिवसांपासून हि महिला बेपत्ता होती. त्यामुळे आता तिच्या मृत्यूने तिची 12 दिवसांची लहान मुलगी पोरकी झाली आहे.

उल्हासनगरमधील अंजना कांबळे यांची मुलगी शीतल हिचा पिंपरीमधील मोरवाडी येथे तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मागील दोन तीन महिन्यांपासून ती बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आली होती. तिने 12 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर मुलीचे बारसे देखील घालण्यात आले. मात्र त्यानंतर रात्री हि महिला बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह वालधुनी नदीत आढळून आला. तिच्या आईने सांगितलेल्या माहितीनुसार, मुलगी झाल्याने ती नाराज झाली होती. त्यामुळे आता महिलेच्या या निर्णयाने तिची तान्हुली मात्र आपल्या आईच्या प्रेमाला कायमची मुकली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा नोंदविला गेला नसून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या