‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. मंदिरात घंट्याला तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीची आत्महत्या की घातपात, याचे गुढ कायम आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. कौसर नायकवाडी असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

कौसर ही इयत्ता अकरावीमध्ये शिकत असून तिचा आज वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गावाजवळील गजानन महाराज मंदिरात गेली होती. तिचे मित्र-मैत्रिणी निघून गेल्यानंतर तिचा मृतदेह गावातील एका देवीच्या मंदिरातील घंट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नातेवाईकांनी तिची आत्महत्या नाही तर घातपात असल्याचे म्हटले आहे. तिच्या वाढदिवस साजरा करतेवेळी असलेल्या मुलांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच जोपर्य़ंत आरोपीला पोलीस पकडत नाहीत तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like