वाकड : इंग्रजी बोलता येत नाही म्हणून सूनेचे छळ, सुनेची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड: पोलीसनामा आॅनलाइन

नवीन सुनेला इंग्रजी बोलता येत नसल्याने तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.१२)  सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रहाटणी येथील समता कॉलनीमध्ये घडला.

सारिका उर्फ प्रतीक्षा गणेश डांगेपाटील उर्फ पाटील (वय -२० रा. समता कॉलनी, रहाटणे) असे मयत महिलेचे नाव आहे. वाकड पोलिसांनी पती गणेश रमेश डांगेपाटील उर्फ पाटील, सासु सुरेखा रमेश डांगेपाटील(वय- ४५ दोघे रा. रहाटणी, मुळ रा. पिपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), नणंद दिपाली चंद्रकांत डडवळ, चंद्रकांत बाबासाहेब डिडवळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ रवींद्र राजाभाऊ गलांडे (वय-२१ रा. यळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0280982a-86b3-11e8-9ad5-25207a29664d’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सारीका आणि गणेश याचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला आहे. गणेश हा पिंपरी-चिंचवड मध्ये चालक म्हणून काम करतो. गणेश पती गणेश, सासू, नणंद हे सारीकाला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून वारंवार त्रास देत होते. तसेच लग्नापूर्वी तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही या मुद्यावरुन तिला मानसिक त्रास देत होते. या विषयी दोन दिवस अगोदर तिने भाऊ रवींद्र गलांडे याला फोनवरून माहिती दिली होती. गुरुवारी दुपारी पती गणेश कामावर तर सासू ही घराबाहेर असताना मानसिक त्रासाला कंटाळून सारिकाने राहत्या  घरात गुरुवारी सायंकाळी हॉलमधील स्लॅपच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.