शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्या घरातील मुलाचे हट्ट मी पुरवू शकतो. पण दुसऱ्याच्या घरातील मुलाचे हट्ट मी कसे पुरवू शकतो असे विधान शरद पवार यांनी सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल केले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला मारला आहे. ते म्हणाले माझ्या मुलासोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी विचारले असता ते म्हणाले, निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय आदित्य स्वत: घेईल. आदित्यवर कोणतेही बंधन नाही. शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतेही बंधन टाकेलं नव्हतं, तसं मी देखील त्याच्यावर बंधन टाकलं नाही. त्यामुळे निवडणूक लढवायची कि नाही ते तोच ठरवेल.

भाजप सत्तेत येईल पण मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यासंदर्भात प्रश्न विचारले असता उद्धव ठाकरे यांनी टोला लगवणारे उत्तर दिले. ‘शरद पवार अष्टपैलू आहेत. आजपर्यंत उत्कृष्ट राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ज्योतिष म्हणून त्यांची ओळख झालेली नाही’, असा टोला त्यांनी लगावला.

युतीच्या सर्वजागा जिंकण्याचा युतीचा प्रयत्न असणार असून येत्या दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येणार आहे. अजून निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मी माझे सगळे पत्ते आत्ताच उलगडणार नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ह्याही बातम्या वाचा –

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला अभिनयात नाही तर, ‘या’ क्षेत्रात करायचे आहे करिअर

#AirStrike : एअर स्ट्राईकबाबत अमित शहांचा मोठा खुलासा