Sulakshana Shilwant | शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश ! राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवक पद रद्द; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना साथीच्या आजारामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेला थेट पद्धतीने मास्कचा पुरवठा (Mask Supply) करणाऱ्या मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. (Addison Life Sciences Pvt. Ltd.) या कंपनीसोबत संबंध सिद्ध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका (NCP Corporator) सुलक्षणा शिलवंत (Sulakshana Shilwant) यांचे पद रद्द करण्यात आले आहे. शिलवंत (Sulakshana Shilwant) यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी बुधवारी (दि. 24) हे आदेश जारी केले आहेत.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) कोरोना महामारीच्या (Corona epidemic) पहिल्या टप्प्यात शहरातील झोपडपट्टीमधील
नागरिकांना वाटप करण्यासाठी 10 लाख रुपयांच्या मास्कची थेट खरेदी केली होती.
यापैकी मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीने 1 लाख मास्कचा प्रतिनग 10 रुपये या प्रमाणे पुरवठा केला.
त्यासाठी पालिकेने 10 लाख रुपये कंपनीला दिले होते.
लोकप्रतिनिधी संबंधित असलेल्या कोणत्याही कंपनीला अथवा संस्थेला आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविता येत नाही.

 

महापालिकेला मास्क पुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये नगरसेविका सुलक्षणा शिलवंत (Sulakshana Shilwant) यांचे पती राजू धर (Raju Dhar) व त्यांचे भाऊ राजरत्न शिलवंत
(Rajaratna Shilwant) हे संचालक आहेत.
त्यामुळे माजी नगरसेवक व शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी जितेंद्र ननावरे (Jitendra Nanavare) यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात न्यायालयाने विभागीय आयुक्तांना 6 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी अंतिम निकाल दिला आहे.

सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, उपरोक्त कंपनीस दीर्घ मुदतीचे कर्ज हे सुलक्षणा शिलवंत यांनी दिलेले दिसून येत आहे.
सदर कर्ज अस्तित्त्वात नसलेबाबत कोणताही पुरावा त्यांच्याकडून सादर केला गेला नाही.
त्यामुळे त्यांचा कंपनी सोबत संबंध असल्याचे निदर्शनास येते.
तसेच कंपनीशी संबंध असल्याने मास्क खरेदी प्रक्रियेत देखील त्यांचा संबंध दिसून येत आहे.

 

Web Title : Sulakshana Shilwant | Success in Shiv Sena’s pursuit! NCP corporator Sulakshana Shilwant’s corporator post canceled; Big blow to NCP

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Honeymoon | हनीमूनला जोडप्यांनी कधीही करू नयेत ‘या’ 8 चूका, करावा लागेल पश्चाताप

R Ashwin | आर. अश्विन लवकरच मोडणार हरभजन-कुंबळेचा ‘रेकॉर्ड’

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम तुम्हाला देईल दरमहा पैसे, इतक्या वर्षात होईल 1.50 लाखाचा फायदा