Sumona Chakravarti | कपिलने ओठांवर केलेल्या जोक्सवर सुमोना चक्रवर्तीने सोडले मौन; “मला खूप वाईट वाटलं…”

पोलीसनामा ऑनालाइन – Sumona Chakravarti | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) सर्वत्र पाहिला जातो. कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांच्या सहज विनोदामुळे व विनोदाच्या योग्य टायमिंगमुळे हा शो खूप गाजला आहे. यामध्ये ऑन स्क्रीन कपिल शर्माच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) ही आता चर्चेमध्ये आली आहे. सुमोनाने तिच्या ओठांवर व चेहऱ्यावर कपिलने केलेल्या जोक्सवर मौन सोडले आहे. तिच्या चेहऱ्यावरुन कपिलने केलेल्या कमेंटमुळे ती खूप अपसेट झाली होती.

अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बडे अच्छे लगते है (Bade Acche Lagte Hai), कॉमेडी नाईट विथ कपिल (Comedy Night With Kapil) अशा टीव्ही शोमध्ये काम केले. तिचे सरला हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. मात्र तिच्यासाठी हे काम पहिल्यांदा करणे सोपे नव्हते. कपिलने तिच्या चेहऱ्यावर व ओठांवर (Sumona Chakravarti Lips) केलेल्या जोक्स मुळे ती खूप अपसेट झाली होती. एका मुलाखतीमदरम्यान तिने याचा खुलासा केला आहे. सुमोनाने सांगितले की, सुरुवातीच्या काळात तिच्यासाठी कपिल शर्माने तिच्यावर (Kapil Sharma And Sumona) केलेल्या विनोद स्वीकारणे व ही चेष्टा सहन करणे खूप कठीण होते.

मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, “सुरुवातीचे काही दिवस फार कठीण होते कारण मला आठवते की, त्यांनी सुरुवातीलाच माझ्या चेहऱ्याची चेष्टा केली. त्याने पहिल्याच एपिसोडमध्ये माझ्या चेहऱ्यावर विनोद केला आणि तो विनोद चालला नाही. मला वाईट वाटले आणि यावर कोणीही हसले नाही. म्हणून त्याने तो करणे सोडले मात्र दुसऱ्या शो मध्ये तो विनोद चालला. पण मला खूप वाईट वाटलं होत. यावेळी मला अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांनी समजून घेतले व दिलासा दिला.”

ती पुढे म्हणाली की, अर्चना यांनी माझ्यासोबत बसून मला विचारले की तू उदास का आहेस? तेव्हा मी सांगितले की, “त्यांनी माझ्या तोंडाची, माझ्या ओठांची आणि प्रत्येक गोष्टीची चेष्टा केली. मी त्या ओळी विसरलेले नाही. मी काही स्टँड-अप कॉमेडियन नाही, की असे विनोद मी करू शकत नाही. म्हणजे मी विनोद केला तर कोणाला समजणार नाही.” यावेळी अर्चनाने सांगितले होते, “जर तू स्वतःवर हसायला शिकली तर पुढे कोणीच तुझा अपमान करु शकत नाही.”

त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) हिने स्पष्ट केले की, “ऑन स्क्रीन जरी कपिल माझ्यावर विनोद करत असले तरी स्टेजच्या मागे ते माझ्या लूक्सचे व माझे कौतुक करायचे. पुढे ती म्हणाली की, ही एक स्क्रिप्ट आहे की ज्यामध्ये मी सभ्य दिसणारी मुलगी आहे. तसेच हा अपमान कपिल शर्मा सुमोनाचा करत नाहीये तर हे दोन पात्र आहेत जे एकमेकांसोबत भांडण करत आहेत. ते नवरा बायको आहेत त्यामुळे ते एकमेंकांची टिंगल करत आहेत.”

Web Title :   Sumona Chakravarti | sumona chakravarti felt bad on kapil sharma lips joke comedian says not one soul laughed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा