Sunetra Ajit pawar | अजितदादांसाठी सुनेत्रा पवारांनी घेतला खास उखाणा, राष्ट्रवादी नावाचाही उल्लेख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sunetra Ajit pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांसाठी खास उखाणा घेतला. (Sunetra Ajit pawar)

या कार्यक्रमातील हा उखाण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मंगळागौर कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांना उखाणा घेण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांनी असा उखाणा घेतला (Sunetra Ajit pawar) –

गणपतीला वाहते दुर्वा
पांडुरंगाला वाहते तुळशी
अजितरावांचे नाव घेते
राष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी

सुनेत्रा पवार यांनी हा खास उखाणा घेतल्यानंतर तो सर्वत्र व्हायरल होत आहे. उखाणा घेत त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांची सुद्धा मने जिंकली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितल्यानंतर उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

समर्थक आमदारांसह अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. ते भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांत मोठी अस्वस्थता दिसून येत होती. अजित पवार यांचे
चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा सध्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ग्राहकांची टू बीएचके पेक्षा थ्री बीएचकेला पसंती; मोठे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न, सर्वेक्षणातून आले समोर

MLA Ram Satpute | आमदार राम सातपुते यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; “उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची प्रवृत्तीच…”

Prakash Ambedkar On Bjp And RSS Agenda | निवडणुकीसाठी मुस्लीम-दलितांचा नरसंहार करू शकतात भाजपा-आरएसएस, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ