Sunetra Pawar | सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना ग्वाही, मला सर्व प्रश्नांची जाण, जबाबदारीची जाणीव ठेवूनच काम करेन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sunetra Pawar | माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणे ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन, अशी ग्वाही बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना दिली. त्या प्रचारादरम्यान एका गावभेटीत बोलत होत्या. (Baramati Lok Sabha)

सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार सध्या बारामतीमध्ये सुरू आहे. त्या गावोगावी भेटी देत असून जोरदार भाषणही करत आहेत. मतदारांना विकासाचे आश्वासन देऊन मतदान करण्याचे आवाहन त्या गावोगावी करत आहेत.

या गावभेटीत सुनेत्रा पवार म्हणाल्या, सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो.
त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे.
त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणूक लढवत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर माझा भर असेल.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीची वज्रमूठ घट्ट झाली आहे.
ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला मतदान करुन हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून संसदेत पाठवाल अशी अपेक्षा आहे.

अजित पवारांचा वादा आणि मोदींची गॅरंटी याचा रोज प्रचारादरम्यान प्रत्यय येत आहे.
आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण तुम्ही आम्हाला मतदान करुन विजयी करा, असे आश्वासन त्यांनी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया