Sunil Kedar | अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री सुनिल केदार यांना एक वर्षाची शिक्षा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांना नागपूर जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची सजा सुनावली आहे. कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्चदाब वाहिनीचे काम सुरू असताना सहाय्यक अभियंत्याला मारहान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी आज दि.१३ न्यायालयाने निकाल दिला. (Sunil Kedar)

६ ऑक्टोबर २०१६ मध्ये महापारेषण कंपनीकडून कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्चदाब वीजवाहिनीचे काम सुरू होते. त्यासाठी त्या कामादरम्यान येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी देखील अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. वाहिनीसाठी येथे मोठे मोठे मनोरे उभारण्यात आले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा अधिकारीही होता. (Sunil Kedar)

अधिकारी आणि शेतकऱ्यांची चर्चा सुरू असतानाच माजी मंत्री सुनिल केदार आणि त्यांचे सुमारे २० सहकारी तेथे पोहचले. महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी कुणी दिली? असा प्रश्न करत त्यांनी आणि इतर चौघांनी सहाय्यक अभियंता खुबाळकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात करून अचानक मारहान सुरू केली.
तसेच पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, असा दम अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप सुनिल केदार यांच्यावर करण्यात आला होता.

या प्रकरणी माजी मंत्री सुनिल केदार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचे सगळे पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने माजी मंत्री सुनिल केदार यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.
शासनातर्फे अ‍ॅड. अजय माहुरकर यांनी युक्तिवाद केला.

Web Title :- Sunil Kedar | mla sunil kedar is convicted under section 353 of indian penal code

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा भाजप खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा

Amit Deshmukh | भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं बोलले अमित देशमुख; म्हणाले…