Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कॅनडामध्ये जन्मलेल्या सनी लिओनीचं (Sunny Leone) खरं नाव करणजीत सिंग वोहरा असं आहे. बॉलीवूडमध्ये तिने बेबी डॉल म्हणून ओळख मिळवली. सनी लिओनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत काम करायची. अशी हि सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असणारी सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच चर्चेत असते. मात्र आता सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

 

सनी लिओनी मणिपूरमधील इंफाळ येथील हाऊस ऑफ अली फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करण्यासाठी तिथे येणार होती. त्याचबरोबर हट्टा येथे हातमाग- खादी उद्योगाला आणि मणिपूरमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे उपस्थित राहणार होती. या शो मध्ये सनी लिओनीला (Sunny Leone) पाहण्यासाठी मोठी गर्दी जमणार होती. त्यामुळे खूप लोकांनी तिकिटांची खरेदी केली होती. मात्र तिथे एक धक्कादायक घटना घडली. जिथे फॅशन शो होणार होता, तिथे बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाच्या स्थळापासून 100 मीटर दूर अंतरावर झाला.
आतापर्यंत कुठल्याही अतिरेकी संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.
सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. इंफाळच्या माजी एसपी महारबम प्रदीप सिंह यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
आम्हाला संशय आहे की, हे चीनी ग्रेनेड सारखं स्फोटक उपकरण आहे, ज्यामुळे स्फोट झाला.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
बॉम्ब हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्फोटानंतर पोलीस कमांडोंच्या पथकाने घटनास्थळाच्या आसपास शोध मोहीम सुरू केली.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

 

Web Title :- Sunny Leone | explosion in imphals hatta kangjeibung ahead of sunny leones visit to manipur for fashion show event

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा

Vani Jayaram Passes Away | पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन