Sunny Leone | ‘पतली कमरिया’ गाण्यावर सनी लिओनीने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. सनी लिओनी (Sunny Leone) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकताच तिने एका ट्रेंडींग गाण्यावर डान्स केला आहे. सध्या तिच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याने अक्षरशः तरुणांना वेड लावले आहे. या गाण्यावर अनेक कलाकार, सोशल मीडिया स्टार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. आता याच गाण्यावर अभिनेत्री सनी लिओनीने भन्नाट डान्स केला आहे. सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये ती आपल्या सहकाऱ्यांसोबत नाचताना दिसत आहे.

सनी लिओनीबद्दल (Sunny Leone) बोलायचे झाल्यास तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सनी लिओनीचा जन्म जरी कॅनडामध्ये झाला असला तरी ती मूळची भारतीय आहे.
तिने 2011 साली डॅनिअल वेबरशी लग्न केलं होतं.
2017 साली तिने महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका अनाथालयातून मुलगी निशाला दत्तक घेतलं.
त्यानंतर 2018 मध्ये सनी आणि डॅनिअलनं सरोगसीद्वारे अशर आणि नोआ या दोन मुलांना जन्म दिला आहे.

 

Web Title :- Sunny Leone | actress sunny leone patali kamariya mori video viral social media reel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ