कोलकाता कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लियोनी सर्वात Top ला, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर प्रश्न

कोलकाता : वृत्त संस्था – कोलकाताच्या एका कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी गुरूवारी जारी मेरिट यादीत बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनचे नाव वरच्या स्थानी दिसून आले. कोलकाताच्या आशुतोष कॉलेजमध्ये इंग्रजी बीए (ऑनर्स)मध्ये प्रवेशासाठी जारी पहिल्या यादीत अभिनेत्रीचे नाव सर्वात वर होते. यादीत नावासह अर्ज आयडी, रोल नंबर, इयत्ता 12 च्या बोर्डाच्या परिक्षेत प्रमुख चार विषयात मिळालेले गुण सुद्धा दिलेले होते.

कॉलेजच्या एका अधिकार्‍याने म्हटले, हे एखाद्या खोडसाळ व्यक्तीचे हे काम आहे, कारण कुणीतरी जाणीवपूर्वक लियोनच्या नावाने चुकीचा अर्ज जमा केला आहे. आम्ही प्रवेश विभागाला ते दुरूस्त करण्यास सांगितले आहे. या घटनेची चौकशी करणार आहोत. या घटनेवरून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सनी लियोनीच्या जीवनावरील वेब सीरीज
काही दिवसांपूर्वीच माजी पॉर्नस्टार सनीच्या जीवनावर आधारित वेब सीरीज करनजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी आली होती. यामध्ये जीवनातील अशा अनेक घटना होत्या ज्या कुणालाही माहित नव्हत्या. सनीचे निक नेम गुग्गु होते. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती. यामध्ये सनीच्या शाळेतील एक घटना दाखवली होती, शाळेत तिच्या लुकवरून तिला ट्रोल केले जात असे.