Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Sunny Leone |मुंबई शहरामध्ये (Mumbai City) उद्योपती, अभिनेत्री यांच्या नावावर असलेल्या, कारचा बनावट क्रमांक (Fake number) वापरणाऱ्या गाड्या शहरामध्ये फिरत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. यामध्य उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata), अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) यांच्या नावावर असलेल्या गाडीचा क्रमांक दुसऱ्या गाड्यांना वापरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सनी लिओनीने (Sunny Leone) तक्रार दिली आहे. यामध्ये ई-चलनच्या (e challan) माध्यमांमधून मागील 6 महिन्यात 241 बनावट नंबर प्लेटची प्रकरणे मुंबईत उघड झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक विभागाने (mumbai traffic branch) 17 जणांवर गुन्हे (FIR) दाखल केले आहेत.

अभिनेत्री सनी लिओनच्या कारचा नंबर दुसरा कोणीतरी वापरत होता. यामुळे वाहतूक नियम मोडल्या प्रकरणात सनीला वाहतूक पोलिसांनी (traffic police) ई-चलन पाठवण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात सनीच्या बीएमडब्ल्यू (BMW) कार सारखी कार वर्सोवाच्या कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) समोर अच्युतराव पटवर्धन मार्गावर उभी असल्याचे दिसून आले.

सनी लिओनची पोलिसांत तक्रार

एकाच रंगाच्या आणि सारख्या दिसणाऱ्या दोन गाड्या आणि नंबर सारखाच असल्याने वाहतुक पोलीस देखील चक्रावून गेले. त्यांनी संबंधितांकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी सनी लिओनच्या पतीने त्याच्या गाडीची कागदपत्रे वाहतूक पोलिसांना आणून दाखवली. त्यानंतर खऱ्या आणि खोट्या गाडीचा न्याय निवाडा झाला. यानंतर सनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova police station) गुन्हा दाखल केला.

रतन टाटांना पाठवले ई-चलन

दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना देखील अशाच प्रकारचा सामना करावा लागला. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी टाटा यांना ई-चलन पाठवले. यावेळी टाटा यांना याचे आश्चर्य वाटले होते. नियम न मोडता ई-चलन कसं आलं, याबाबत माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. रतन टाटा यांच्या गाडीचा क्रमांक एक महिला आपल्या गाडीवर लावून फिरत होती. अशा प्रकारची 241 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

6 महिन्यात 40 हजार तक्रारी

ई-चलन आल्यानंतर वाहन धारकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.
मागील सहा महिन्यात वाहतूक शाखेकडे तब्बल 39 हजार 950 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात 4 हजार 105 तक्रारीत चुकून ई-चलन पाठवण्यात आल्याचे समोर आले.
अशा प्रकरणांचा तपास करत असाना 241 बनावट नंबर प्लेटची प्रकरण उघडकीस आली आहेत.
यामध्ये 17 प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. तपासणीत 3 चोरीच्या गाड्या आढळून आल्या.

Web Title : sunny leone ratan tata mumbai car mumbai police FIR on 17

Aloe Vera farming | 50,000 रूपयात सुरू करा आपला स्वत:चा बिजनेस,
5 लाखापर्यंत होईल मोठा नफा; जाणून घ्या काय करावे लागेल?

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या