Super Foods | हळदीपासून मशरूमपर्यंत, कॅन्सरसोबत लढू शकतात ‘हे’ सुपरफूड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पोषक तत्वांनी युक्त असा आहार आपल्याला रोगांपासून वाचवतोच पण रोगप्रतिकारशक्ती (Immunity) ही मजबूत करतो. काही पदार्थ (Super Foods) असे आहेत जे कर्करोगासारख्या (Cancer) आजाराशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहेत. फोर्टिस हॉस्पिटलच्या आहारतज्ञ श्वेता महाडिक म्हणतात की, मात्र एखादा विशिष्ट आहार कर्करोग टाळू शकतो असे कोणतेही पुरावे नाहीत. आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करणे हृदयविकार (Heart Disease), मधुमेह (Diabetes) आणि कर्करोग (Cancer) यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी (Super Foods) आहे.

 

ब्रोकोली (Broccoli), बेरी ( Berry) आणि लसूण (Garlic) हे पदार्थ कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या पदार्थांमध्ये कॅलरी (Calories) आणि चरबी (Fats) कमी असते. ते फायटोकेमिकल्स (Phytochemicals) आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये (Antioxidant) समृद्ध असतात जे कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

कर्करोगासारखे आजार टाळण्यासाठी आहारात सुधारणा करणे आवश्यक आहे. अशा पदार्थांचा आहारात समावेश करा, जे सेवन केल्याने कर्करोगासारखे आजार टाळता येतील. कॅन्सरपासून बचाव करणार्‍या अशाच पाच सुपरफूड्सबद्दल (Super Foods) जाणून घेऊया…

 

कॅन्सरपासून बचाव करणारे 5 सुपरफूड्स (5 Super Foods That May Help Prevent Cancer)

अळशी (Flaxseed) :
अळशीमध्ये उच्च प्रमाणात लिग्नॅन (Lignans) असतात जे स्तनाच्या कर्करोगापासून (Breast Cancer) संरक्षण करतात. अळशी आणि अळशीच्या तेलामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acid) असते जे स्तनाच्या कर्करोगासाठी जबाबदार असलेल्या कर्करोगाच्या पेशींपासून (Cancer cells) संरक्षण करते.

 

हळद (Turmeric) :
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन (Curcumin) स्तनाचा कर्करोग, फुफ्फुस (Lung) आणि त्वचेचा कर्करोग (Skin Cancer) यांसारख्या कर्करोगाच्या पेशींना रोखू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की यातील अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आणि अँटी-इम्फ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म स्तनाच्या कर्करोगाशी लढण्यास आणि त्याचा प्रसार रोखण्यास मदत करतात.

ब्रोकोली (Broccoli) :
ब्रोकोलीमध्ये इंडोल-3-कार्बिनॉल (Indole-3-carbinol) हे कर्करोगाशी लढणारे संयुगे असते, जे इस्ट्रोजेन (Estrogen) चयापचय बदलण्यास मदत करते आणि स्तनाच्या ट्यूमर पेशींच्या (Breast Tumor Cells) वाढीस प्रतिबंध करते.

 

मशरूम (Mushrooms) :
मशरूममध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-व्हायरल (Anti-viral), कोलेस्ट्रॉल-कमी करणारे आणि इम्युनिटी मजबूत करणारे गुणधर्म असतात
जे रक्तदाब (Blood Pressure) आणि शुगर कंट्रोल (Sugar Control) करतात.
मशरूम व्हिटॅमिन बी 3 (Vitamin B3) आणि व्हिटॅमिन बी 2 (Vitamin B2) चा चांगला स्रोत आहे.

 

ब्लूबेरी (Blueberries) :
ब्लूबेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे स्तनाचा कर्करोग रोखण्यात मदत करतात.
ब्लूबेरीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स स्तनाच्या कर्करोगाच्या विविध प्रकारांची वाढ आणि प्रसार रोखण्याचे काम करतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Super Foods | 5 super foods include in your diet that can fight cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Disha Salian | दिशा सालियनच्या आईनं केली हात जोडून विनंती; म्हणाल्या – ‘राजकारणामुळं जगणं मुश्किल झालंय, आम्हाला जगू द्या’

 

7th Pay Commission | होळीसाठी सरकारी कर्मचार्‍यांना भेट! सरकार देतंय 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा

 

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या