Superfoods for Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करू शकतात ‘हे’ 7 सुपरफूड्स, तात्काळ करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Superfoods for Weight Loss | आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक लोक त्यांचे वाढते वजन आणि लठ्ठपणामुळे (Obesity) त्रस्त आहेत. तासन्तास जिममध्ये घाम गाळून किंवा डाएटिंग करूनही लठ्ठपणामुळे लोकांना त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत (Superfoods for Weight Loss). जर तुम्हीही लठ्ठपणामुळे किंवा वाढत्या वजनामुळे तुमची आवडती गोष्ट खात नसाल तर टेन्शन सोडून या सुपरफूड्सचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा. काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसेल (Weight Loss Diet).

 

न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्सपर्ट वरुण कात्याल (Varun Katyal, Nutritionist And Wellness Expert) म्हणतात की, काकडी इतर अनेक पोषक तत्वांसह व्हिटॅमिन सी आणि के (Vitamin C And K) चा चांगला स्रोत आहे. जे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत करते. काकडीत कॅलरीज कमी असतात. त्यामुळे व्यक्तीचे पोट भरलेले जाणवते. जे वजन कमी करण्यात खूप फायदेशीर आहे (Best Superfoods For Weight Loss And To Burn Belly Fat Quickly).

 

हे सुपरफूड करतील वजन कमी करण्यास मदत (These Superfoods Will Help To Lose Weight) –

1. ग्रीन टी (Green Tea) –
ग्रीन टी मेटाबॉलिज्म रेट वाढवून भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यात व्यक्तीला फायदा होतो. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न क्षमता सुधारते. हे शरीरातील पाण्याचे वजन कमी करण्यास देखील मदत करते. यासोबतच शरीरातील चरबी शोषण्याची क्षमताही कमी करते (Superfoods for Weight Loss).

2. काकडी (Cucumber) –
काकडीत 90 टक्के पाणी आणि 10 टक्के फायबर असते. याचे सेवन केल्याने शरीरातील ब्लोटिंगची समस्या कमी होते आणि व्यक्तीला जास्त वेळ भूक लागत नाही. सॅलडमध्ये जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्यक्ती कमी अन्न घेते. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

 

अंडी (Eggs) –
प्रोटीन समृध्द अंड्याचा पांढरा भाग तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन मदत करू शकतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात प्रोटीन युक्त अंड्यांचा समावेश करा. अंड्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास खूप मदत होते. अंडी खाल्ल्यानंतर तुमची भूक शांत होते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. अंड्यांमध्ये सेलेनियम आणि रिबोफ्लेविन सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

 

सफरचंद (Apple) –
सफरचंदांमध्ये असलेले पेक्टिन हे एक प्रकारचे विद्रव्य फायबर आहे जे भूक कमी करण्यासाठी ओळखले जाते. हे रसदार फळ एक उत्तम नाश्ता पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

 

केळी (Banana) –
केळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. कच्च्या केळ्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च देखील असते, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

 

क्विनोआ (Quinoa) –
प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेले क्विनोआ खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते,
त्यामुळे तुमची भूकही कमी होते. क्विनोआमध्ये 9 अत्यावश्यक अमीनो अ‍ॅसिड असते जे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

 

चिया सीड्स (Chia Seeds) –
चिया सीड्सचे सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीला प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला डोस मिळतो.
वजन कमी करण्यासाठी, दररोज 1 चमचा चिया सीड्स एका ग्लासमध्ये भिजवा. हे पाणी दुपारी जेवण्यापूर्वी प्या.
काही दिवसातच तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Superfoods for Weight Loss | weight loss diet best superfoods for weight loss and to burn belly fat quickly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Covid Restrictions | ‘…तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता’ – मंत्री अस्लम शेख

 

Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या लेटेस्ट रेट