आशा बुचके यांच्या समर्थकांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत या कारवाईच्या विरोधात आशाताई बुचके समर्थक जुन्नर शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख शिवदर्शन खत्री, माजी स्वीकृत नगरसेवक सुजित परदेशी तसेच आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.

जुन्नर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बुचके समर्थकांच्या बैठकीत शिवसेना पक्षाकडून आशाताई बुचके यांच्यावर झालेल्या या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. जुन्नर शहर संघटक कुलदीप वाव्हळ, ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष शैलेश बनकर, विभागप्रमुख पुष्कराज जंगम, सम्राट कर्पे, चंद्रकांत सोनवणे, मुकेश परदेशी, मंगेश साळवे, अतुल काशीद, अनिल पुंडे, चंद्रकांत फलके, रोहन करडिले, शंकर जणानी, कुतुब शेख, राहुल पुरवंत आदींसह शिवसैनिकांनी राजीनामे दिलेले आहेत.

शिवसेना पक्षाकडून बुचके यांच्यावर झालेली कारवाई आम्हाला मान्य नाही. आशाताई बुचके यांनी सातत्याने पक्षबांधणी केलेली आहे, आणि आम्ही आशाताई बुचके यांच्या पुढील राजकीय वाटचालीत त्यांच्याबरोबर कायम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात