Supreme Court – Ajit Pawar | ”मतदार हुशार आहे, त्याला कोणाचा पक्ष ते समजते”, अजित पवार गटाला कोर्टाने सुनावले, नावावर घेतला आक्षेप

नवी दिल्ली : Supreme Court – Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने (Sharad Pawar) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावावरच आक्षेप घेतला. या नावामुळे गोंधळ उडेल असे म्हटले. यावर न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावले आहे.

अजित पवार गटाच्या आक्षेपावर न्यायालयाने म्हटले, मतदार हुशार आहे, त्याला कोणाचा पक्ष असेल ते समजते. यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या नावावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेच पुढील तीन आठवडे तेच नाव कायम असेल, असे निर्देश दिले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीला कमी काळ राहिला आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होईल. म्हणून मिळालेले नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम रहावे, अशी विनंती शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

तसेच न्यायालयाने निर्देश दिले की, शरद पवार गटाने पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा. आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका