सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता मराठीसह ‘या’ भाषांमध्ये उपलब्ध होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता इंग्रजी, हिंदी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर निकालपत्र इंग्रजी भाषेत अपलोड करण्यात येत होते. मात्र आता हे निकालपत्र प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे मराठी, कन्नड, आसामी, उडिया, तेलगू, तमिळ या भाषांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे.

या महिन्याच्या अखेरीस हिंदी आणि मराठी भाषेसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्र वेबसाईटवर उपलब्ध होईल. प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. बऱ्याच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. आता हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील निकालपत्र उपलब्ध होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला ५०० पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तविकतः इंग्रजी भाषेतील निकालपत्र खटल्याच्या निकालाच्या दिवशीच वेबसाईटवर अपलोड करण्यात येते. मात्र भाषांतरास वेळ लागत असल्याने हे काही काळासाठी ही प्रक्रिया एका आठवड्याने पार पडेल. या कल्पनेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २०१७ लाच पाठींबा दर्शविला होता.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !