CBSE च्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षा शुल्का’त सूट नाही; सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-19 च्या दृष्टीने चालू शैक्षणिक वर्षात 10 वी आणि 12 वी सीबीएसई (CBSE) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट मिळावी, याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने फेटाळली आहे.

जस्टिस अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबरच्या आदेशाविरुद्ध ‘सोशल ज्युरिस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका फेटाळली. खंडपीठाने म्हटले की, ‘न्यायालय शासनाला असे करण्याचे निर्देश कसे देऊ शकेल? तुम्ही शासनाकडे जावे.’

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले गेले होते की, साथीच्या आजारांमुळे बर्‍याच विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळली आहे.