Supreme Court | ‘खंडणी’ गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) सरन्यायाधीशांनी एक महत्वपुर्ण टिपण्णी केली आहे. भारतीय पोलिस सेवेत राहून खंडणी गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारागृहातच टाकायला हवे, असे स्पष्टीकरण (Supreme Court) सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (Chief Justice N. V. Ramana) यांनी व्यक्त केले आहे. तसेच, दरवेळी अटकेपासून तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. सरकारमध्ये वा सरकारच्या जवळ असल्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. असं देखील म्हटलं आहे.

छत्तीसगड राज्य सरकारने बेहिशेबी संपत्ती गोळा करणे व राजद्रोह या आरोपांवरून आयपीएस अधिकारी गुरिंदर पाल सिंग (IPS officer Gurinder Pal Singh) यांना निलंबित (Suspended) केले होते. दरम्यान, आपणास अटक होऊ नये यासाठी सिंग यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. यावरुन सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (Chief Justice N. V. Ramana) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी गुरिंदर पाल सिंग यांनी याआधीही अन्य प्रकरणात अटकेपासून संरक्षण मागितले होते.
ते प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी आले होते. यानंतर न्यायालय म्हणाले की, अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या कलेने वागतात,
तोर्पयत त्यांचे सारे उद्योग व्यवस्थित सुरू असतात.
पण सत्ताधारी पक्ष बदलला की मग त्यांच्यावर राजद्रोहाचे आरोप लावले जातात. असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Web Title :- Supreme Court | police officers who take bribe should be jailed supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deglur By-Election | देगलूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन