परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh.) यांना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) मोठा दिलासा मानला जात आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांना चांगलेच फटकारले.

तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास साहिला नाही का ? तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता (Hemant Gupta) आणि न्यायमूर्ती वी. रामसुब्रमण्यम (V. Ramasubramaniam) यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे (Mumbai High Court) जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तीवाद केला.

जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये

तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) तुम्ही स्थगिती द्यावी का ? आम्ही सर्व एफआयआरबद्दल बोलत नाही. एफआयआरसाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये, असेही म्हटले.

महाराष्ट्राला मोठा दिलासा

परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रीरी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात पत्र लिहिल्यानंतर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना परमबीर सिंह यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा

सावधान ! ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

Chandrakant Patil | ‘मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठ काय केलं?’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Police Sub Inspector Transfers | राज्यातील 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

Maratha Reservation | मराठा समाजाच्या आंदोलनाची तारीख ठरली

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : supreme court refuses to entertain param bir singh plea seeking transfer of all inquiries against him to an independent agency outside maharashtra