WhatsApp धोरणाच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  WhatsApp च्या नव्या धोरणाच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 5) फेटाळून लावली आहे. सरन्यायाधिशांच्या खंडपीठापुढे सदर याचिका विचारार्थ आली असता, यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याने त्यांना सोयीचा मार्ग स्वीकारावा, असे नमूद करून कोर्टाने याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या प्रायव्हसीच्या संबधातील धोरण बदलले असून त्यांनी नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे धोरण रद्द करावे, अशी मागणी याचिकेत केली होती. या प्रकरणात केंद्र सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पडत नसल्यानेच त्यावर निर्णय दिला पाहिजे, अशी अपेक्षा याचिकेत व्यक्त केली होती. सोशल मिडिया साईटवर केंद्र सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, अशी अपेक्षा यात नोंदवली होती.