Supriya Sule | श्रीरंग बारणे व धैर्यशील मानेंना बैठकीला उपस्थितीचा सुप्रिय सुळेंचा आग्रह; महाविकास आघाडीत बिघाडी…?

0
303
Supriya Sule | barne who defeated partha pawar in discussion again what exactly happened in delhi
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्रातील खासदारांची एक बैठक होती. या बैठकीला शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने यांनीदेखील यावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला होता. मात्र, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या या निर्णयाला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

या विरोधामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने यांना अमित शहा यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले. यात सर्वाधिक चर्चा आहे ती श्रीरंग बारणे यांच्या नावाची. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणुकीसाठी पार्थ पवार उभे होते. त्यांना या मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांनी पराभूत केले होते. बारणे यांनी पार्थ पवार यांचा 2.16 लाख मतांनी पराभव करत एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांच्या नावाचा आग्रह सुप्रिया सुळे (Supriya Sule) का करत होत्या, याच्या उलटसूलट चर्चा सुरू आहेत.

 

सध्या राज्यात दोन महत्त्वाचे वाद आहेत. एक म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
सर्वच पक्षांनी कर्नाटकच्या वादात केंद्राने आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे ही मागणी केली आहे,
तर राज्यपालांच्या विरोधातदेखील कारवाई करत त्यांना पदावरून काढले पाहिजे, अशीदेखील मागणी जोर धरत आहे.
त्यामुळे येत्या 17 डिसेंबरला महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद आंदोलन करणार आहे.

 

Web Title :- Supriya Sule | barne who defeated partha pawar in discussion again what exactly happened in delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम