Supriya Sule | मंत्रीमंडळ विस्तारावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येवून जवळपास सहा महिने पूर्ण होत आहेत. तरीदेखील या सरकारकडून अद्याप मंत्रीमंडळ विस्तार केला गेला नाही म्हणून विरोधक त्यांचे वारंवार कान टोचत आहेत (Supriya Sule). तसेच उभय पक्षांच्या आमदारांमध्ये देखील या मुद्यावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते आपल्याला मंत्रीपद कधी मिळणार याकडे डोळे लावून बसले आहेत. सध्या तरी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सरकार सकारात्मक दिसत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे( Supriya Sule) यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे.

नुकतचं, माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी २०-२२ जानेवारीपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे जाहीर केले होते. मंत्रीमंडळ विस्तारात काही तांत्रिक अडचणी असून त्या १५ जानेवारी पर्यंत संपतील असे सुतोवाच देखील त्यांनी यावेळी बोलताना केले होते. तसेच सरकार व्यवस्थित चालले असून ते २०२४ पर्यंत असेच चालेल. असेही ते म्हणाले. (Supriya Sule)

राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही म्हणत विद्यमान सरकारला फटकारले होते.
त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाना साधला आहे.

जर दोनचं लोक मंत्रीमंडळाचा निर्णय घेणार असतील तर बाकीच्या मंत्र्यांनी करायच तरी काय? असा सवाल करत
शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये खूप कर्तृत्ववान महिला आहेत.
पण भाजपला महिलांबद्दल आदर नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.
असा टोला देखील यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.
तसेच त्यांना जेव्हा ५० खोक्यांचे आमदार म्हटल जात तेव्हा हा फक्त त्यांचा अपमान नसून सबंध महाराष्ट्राचा
तो अपमान आहे. एकच मंत्री सहा जिल्हे सांभाळतो तरी देखील कामे होत नाहीत.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या परिस्थितीला सरकारचं जबाबदार आहे.
असा घणाघात त्यांनी( Supriya Sule) सत्ताधारी भाजप-शिंदे सरकारवर केला.

Web Title :- Supriya Sule | if only two people are deciding the cabinet what about the rest of the ministers supriya sule on shinde and fadanvis government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

State Excise Department | अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुण्यात 25 जणांना न्यायालयाने केला 37 हजारांचा दंड