Supriya Sule On Amol Kolhe | खासदार डॉ. अमोल कोल्हे एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व – सुप्रिया सुळे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Amol Kolhe | शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha) आणि बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramti Lok Sabha) या दोनही मतदारसंघात महायुतीकडून महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi (MVA) उमेदवारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी सुप्रिया सुळे आणि आता नंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी डॉ. कोल्हे यांना नटसम्राट (Natsamrat) म्हणत व्यक्तिगत टीका केली.

दरम्यान अजित पवारांच्या टिकेवर ट्विट करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्ष प्रतिहल्ला केला आहे. “कार्यसम्राट (Karyasamrat) की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की” ! असं ट्विट करत माझ्या काकांच्या पुण्याईवर मी डॉक्टर, अभिनेता नाही तर स्वकर्तृत्ववर मी माझी ओळख असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मध्यमांशी बोलताना डॉ. कोल्हे यांची पाठराखण करत
शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. कोल्हे हे एक अतिशय सुसंस्कृत राजकीय नेतृत्व असल्याचे सांगितले त्याचबरोबर
संसदेतील काम देखील सर्वोत्तम आहे, मतदारसंघातही खूप विकासाची कामे केली आहेत.
त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न ही लोकशाही असल्याचे सूतोवाच करत डॉ. कोल्हे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठराखण केली आहे.

दरम्यान समोरून कितीही राकरणाचा स्थर घसरला तरीही आपण वयक्तिक पातळीवर टीका करायची नाही अशा स्पष्ट सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
त्यामुळे राजकारणात एक सुसंस्कृतपणा जपण्याचे आवाहन देखील डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, ”अजितदादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमकी…”

Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा घडवले राजकीय सभ्यतेचे दर्शन, यासाठी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून घेतला माईक