पक्षाची गळती थांबवण्यासाठी सुप्रिया सुळेंची ‘संवाद’ यात्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेते कोणतीना कोणती यात्रा काढून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा सध्या सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील संवाद यात्रा काढणार असून या यात्रेदरम्यान त्या कार्यकर्ता आणि लोकाशी संवाद साधणार असल्यातरी या यात्रेचे मुख्य कारण आहे पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआर्शीवाद यात्रा, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, शिवसेनेचे नेते आदेश बांदेकरांनी माऊली यात्रा काढली. आता सुप्रिया सुळे संवाद यात्रा काढून जिल्ह्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ आणि गळती रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोललं जातंय. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेला महत्व प्राप्त झाले आहे.

सध्या पक्षातील अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यातच सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेचे नियोजन केल्याने त्यांच्या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाल्याचेही बोलले जातयं. खासदार सुप्रिया सुळे यांची ही संवाद यात्रा शुक्रवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात त्या सहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. दुष्काळासह बेरोजगारीच्या प्रश्नांवर त्या आवाज उठवणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –