Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणातून विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी सुळे म्हणाल्या, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना विविध कारणासाठी अटक करण्यात आली होती. पण त्यांना आता न्याय मिळत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. हे सर्व लढवय्ये नेते आहेत. संघर्ष हा प्रत्येकाला आयुष्यात करावा लागतो. पण आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आणि तो आज सार्थ झाला. आम्ही न्यायदेवतेचे आभार मानतो. ते आता बाहेर आले आहेत. त्यामुळे ते पूर्ण ताकदीने कामाला लागतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात जास्त आरोप कोणत्या कुटुंबावर झाले असतील, तर ते आमच्या कुटुंबावर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर झाले असतील. त्यामुळे आम्हाला किती त्रास झाला असेल, पण आम्ही कधी काही बोललो नाही.

यावेळी सुळे यांना ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या, मला जे काही कळत आहे, ते तुमच्या (पत्रकार) माध्यमातून कळते आहे. पण मला असे वाटते इतिहासाची मोडतोड योग्य नाही. शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी चुकीचे दाखवत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे संभाजी महाराज जो विरोध करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते.

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे चौकशीअंती योग्य कारवाई केली जाईल.
ते आमच्या पक्षाचे असले तरी महाराष्ट्राच्या चौकटीच्या आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर कोणतीही कार्यवाही खपवून घेतली जाणार नाही.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपण भारज जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.
प्रांताध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मी स्वत: भारत जोडो यात्रेत
जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

Web Title :-  Supriya Sule | With the release of Sanjay Raut, our faith in justice remained unshaken

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

Bindi Controversy | अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने टिकली प्रकरणावर केली ‘ही’ पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल