व्यवसायात मंदी ! नामवंत बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोटबंदी सारख्या निर्णयामुले अनेक छोट्या छोट्या उद्योगांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागले होते तसेच अनेक छोटे छोटे उद्योग खुल्या चलना अभावी बंद पडून गेले होते. त्यानंतर अनेक उद्योगांमध्ये मंदी पहायला मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम व्यवसायात मोठी मंदी पहायला मिळत आहे.

रवानी डेव्हलपर्स प्रा.ली ही गुजरातमधील नामांकित बांधकाम व्यवसायातील कंपनी आहे, जिचे मालक हरीश सावजी रवानी हे असून त्यांनी गुजरातमध्ये अनेक उच्चभ्रू इमारतींचे बांधकाम केले आहे. मात्र त्यांनी कंपनीवर असणाऱ्या कर्जाच्या चिंतेने त्यांनी आपल्या फार्महाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. गुजरातमधील सुरत या ठिकाणी या खळबळजनक प्रकार घडला असून यामुळे सर्वच बिल्डर लॉबी चिंतेत आहे.

हरीश यांनी नेमकी आत्महत्या का केली ?
कंपनीवर असलेले कर्ज आणि त्यातच मार्केटमध्ये असलेली मंदी यामुळे गेल्या काही दिवसांपासून हरीश हे मोठ्या तणावाचा सामना करत होते. मनस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांचार उपचारही सुरु होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ते सोमवारी साईटवर जाण्यासाठी निघाले मात्र साईटवर गेलेच नाही. दिवसभर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता अखेर फार्महाऊसच्या एका कर्मचाऱ्याने हरीश यांना पंख्याला लटकल्याचे पाहिले आणि मग नातेवाईकांना सांगितले.

बिल्डर लाईनला मोठा धक्का
सरकारच्या नोटबंदी सारख्या निर्णयामुळे देशातील सगळ्यात जास्त फटका बिल्डर लाईनला बसल्याचे समोर आले आहे. त्यातूनच गुजरातमधील नामवंत बिल्डरने आत्महत्या केल्यामुळे इतर बिल्डरानाही मोठा धक्का बसल्याचे समजत आहे. नोटबंदी सोबतच जी सटी ,रेरा सारख्या कायद्यामुळे व्यावसायिकांचा त्रास आणखी वाढला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like