Surendra Kumar Agarwal In Police Custody | पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट, ड्रायव्हरला डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकीप्रकरणी 77 वर्षीय सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यास कोर्टाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अपघात झाला तेव्हा मी कार चालवत होतो, असे सांगण्यासाठी 77 वर्षीय सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरला घरात डांबून ठेवले, तसेच त्याला धमकी दिली होती. पोलीस तपासात याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) सुरेंद्र अग्रवालला अटक केली होती. आज त्याला पुणे सत्र न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Kalyani Nagar Accident)

पोर्शे कारचा अपघात झाल्यानंतर सुरेंद्र अग्रवालने नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणला. त्याला डांबून ठेवले. गाडी तू चालवत असल्याचे पोलिसांना सांग असे म्हणत त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारीला धमकावले, तसेच पैशाचे अमिश दाखवले. सुरेंद्र अगरवालने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे.(Surendra Kumar Agarwal In Police Custody)

सध्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हा देखील न्यायालयीन कोठडीत आहे. आज कोर्टात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी सुरेंद्र अग्रवालला पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

तर, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला. आरोपी ७७ वर्षांचा असून तो कुठेही पळून जाऊ शकत नाही, तसेच पुराव्यांशी छेडछाड तो करू शकत नाही असा युक्तिवाद केला. पण न्यायालयाने (Pune Shivaji Nagar Court) पोलिसांनी मागणी मान्य करत सुरेंद्र अग्रवालला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)