एसके आणि एसके पुन्हा एकत्र : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी गेल्या काही दिवसांपासुन मतदार संघातील जनसंपर्क वाढविला आहे. खा. काकडे हे भाजपकडून इच्छुक असले तरी देखील त्यांचे सगळयांसोबत चांगले संबंध आहेत. एकेकाळी सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि पुण्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असणार्‍या सुरेश कलमाडी यांच्याशी देखील खा. काकडे यांचे चांगले संबंध आहेत. ते सर्वांना माहित आहे. गणेशोत्सवादरम्यान खा. काकडे यांनी आणखीनच संपर्क वाढविला आहे. खा. काकडे आणि सुरेश कलमाडी यांनी एकत्र पुण्यातील बाबू गेनू मंडळात जावुन गणरायाचे दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

गणेश विसर्जन सोहळ्यात डीजेवरील बंदी कायम; ‘पाला’ ची याचिका फेटाळली

राज्यसभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रामुख्याने कसबा, पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात भेटीगाठीचा धडाका लावला आहे. त्यांनी जवळपास सर्वच प्रमुख गणेश मंडळांना भेटी दिल्या आहेत. बाळासाहेब मारणे अध्यक्ष असलेल्या बाबू गेनू मंडळाला संजय काकडे यांनी भेट दिली. त्यावेळी तेथे सुरेश कलमाडी देखील उपस्थित होते. दोघांची भेट योगायोगाने झाली असली तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. खा. काकडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अलिकडील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम ते आवर्जुन सहभागी होतात. गेल्या दोन दिवसांमध्ये काकडे यांनी प्रामुख्याने मार्केटयार्ड, मुकुंदनगर, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, पर्वती परिसर, टिळक रोड, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ, मंडई, कसबा पेठ, गणेश पेठ, नाना पेठ आणि इतर भागातील प्रमुख गणेश मंडळांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. काकडे यांनी आतापासुनच लोकसभेची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe1a809e-bd6b-11e8-b06d-c7fdcf78f264′]