Suresh Raina | मिस्टर आयपीएलच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी ! सुरैश रैना आता नव्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Suresh Raina | आयपीएल 2022 ला सुरूवात व्हायला काही दिवस शिल्लक आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला (Suresh Raina) कोणत्याही संघाने आपल्या ताफ्यात घेतलं नाही. त्यामुळे रैनाचे चाहते नाराज झाले आहेत. एकेकाळी संपुर्ण सीझन गाजवणाऱ्या रैनाला एकाही संघाने (Suresh Raina) न घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मात्र रैना आयपीएलमध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

 

यंदाच्या लिलावात (IPL Auction 2022) अनसोल्डच्या (Unsold) यादीत सुरेश रैनाचं नाव आहे.
मात्र हा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) आता एक नवी इनिंग सुरू करत आहे.
सुरेश रैना (Suresh Raina) यंदा आयपीएलमध्ये समालोचक (Commentator) म्हणून दिसणार आहे.
रैनासोबत आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी (Successful Bowler) एक असलेला पियुष चावलाही (Piyush Chawla) त्याच्या मदतीला असणार आहे.

 

सुरेश रैना आणि पियुष चावला यांच्यासह भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही (Ravi Shastri) त्यांच्या सोबतीला असणार आहेत. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये (IPL) अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
सुरेश रैनाच्या आयपीएलमध्ये 5528 धावा आहेत. यामध्ये 39 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे.

 

दरम्यान, सुरेश रैनावर आता नवी जबाबदारी आहे मात्र आता त्याच्या हातात बॅट (Bat) नाही तर माईक असणार आहे.
आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर राहण्यापेक्षा कोणत्या तरी माध्यमातून तो जोडला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं डिजनी हॉटस्टारच्या (Disney Hotstar) संजोग गुप्ता (Sanjog Gupta) यांनी सांगितलं.

 

Web Title :- Suresh Raina | ipl 2022 mumbai indians former player piyush chawla will be doing hindi commentary with suresh raina ravi shastri

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा