Sushama Andhare | भाजपाचा बडगुजरांवरील ‘कुत्ता पार्टी’चा आरोप बुमरँग ठरण्याची शक्यता, सुषमा अंधारेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

मुंबई : Sushama Andhare | नाशिकमधील ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलिम कुत्ता (Salim Kutta) सोबत एका पार्टीत सहभागी झाल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आज सभागृहात केला होता. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली. मात्र, आता हे प्रकरण भाजपावर बुमरँग होण्याची शक्यता आहे. कारण या पार्टीत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह ५ भाजपा नेते देखील उपस्थित असल्याचे शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संबंधित पार्टीचे प्रसारमाध्यमांना काही फोटो आणि व्हिडीओ दाखवले. यामध्ये भाजपाचे अनेक नेते दिसत आहेत.

सुषमा अंधारे (Sushama Andhare) म्हणाल्या, हे फोटो आणि व्हिडीओ त्याच पार्टीतले आहेत, ज्याचे फोटो नितेश राणे यांनी दाखवले होते. त्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande), आमदार बाळासाहेब सानप (MLA Balasaheb Sanp), आमदार सीमा हिरे (MLA Seema Here), विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसत आहेत. ती कोणाच्या तरी हळदीची की लग्नाची पार्टी होती.

सुषमा अंधारे म्हणाल्या, त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितेश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा
प्रयत्न करत आहेत. परंतु, नितेश राणे यांना माहिती नसावे की हा फोटो दाखवल्यामुळे ते किती जोरात तोंडघशी पडतील.
त्या पार्टीत हे सगळे भाजपा नेते काय करत आहेत? त्याचेही उत्तर राणे आणि भाजपा नेत्यांनी द्यावे, असे आव्हान
अंधारे यांनी दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा कॅप्टन जाहीर, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या जाणून घ्या

Pune Crime News | पुण्यातील नामांकित कंपनीच्या महिला अकाउंटंटची लाखोंची फसवणूक, संचालक असल्याचे भासवून घातला गंडा